सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा कार्यकारणी बैठक नुकतीच पार पडली. जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, शरद गाडे यांच्या उपस्थितीत वाई, कराड, पाटण, सातारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय सभासद ऑनलाईन नोंदणी करणे, पक्षामध्ये युवक, महिला ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग वाढवणे, पूर्णवेळ कार्यकर्त्याची टीम तयार करणे , जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिका वॉर्डनुसार छोटे छोटे मेळावे आयोजित करणे, निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवाराची यादी तयार करणे, गाव तिथे शाखा यासाठी प्रयत्न करणे यासाठी तन-मन धनाने सहकार्य करून वंचित आघाडीची ताकद वाढवण्यासाठी व येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणुकीमध्ये भरघोस यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन देसाई यांनी केले.
बैठकीचे प्रास्ताविक महासचिव शरद गाडे यांनी केले. बैठकीचा अजेंडा वाचन, सुत्रसंचालन व आगामी भूमिकेबद्दल विवेचन महासचिव गणेश भिसे यांनी केले. आभार संदिप कांबळे यांनी मानले. बैठकीमध्ये कराड तालुका अध्यक्ष प्रा.दिलीप लोखंडे, पाटण तालुकाध्यक्ष बाबासाहेब जगताप, जिल्हा संघटक सुहास पुजारी, प्रमोद शिरसागर, उमेश खंडुझोडे, सुभाषराव शिलेवंत, विजय वानखेडे , अशोकराव दीक्षित , पत्रकार अनिल मोरे , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काशीळकर , संदेश नरवडे ,कराड शहर अध्यक्ष संतोष बोलके , पाटण तालुका महिला अध्यक्ष रेखा जाधव, पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वाई तालुक्यातून आश्विन शरद जाधव, हेमंत धर्मा गायकवाड, सूर्यकांत साहेबराव सूर्यवंशी, संतोष महादेव कदम, दत्तात्रय धोंडीबा कांबळे , विकास बबन जाधव ,भाऊसाहेब अर्जुन काळेमोहसीन पटेल , शिवाजी बाळकृष्ण क्षीरसागर ,मानसिंग धोंडीबा कांबळे ,विठठल मारुती काशीद ,विजय लक्ष्मण जगताप ,दत्तात्रय धर्माजी गिरी ,संतोष रामदास नलवडे ,सोपान हिरामण कांबळे ,बबन नामदेव कांबळे , रोहित भाऊ गायकवाड , संजय ओव्हाळ , सातारा तालुक्यातील वैभव गवळी , दत्तात्रय लक्ष्मण सावंत , कराड तालुक्यातील पत्रकार अनिल मोरे , पाटण तालुक्यातील संदेश नरवडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
बैठकीस मिलिंद कांबळे, बाळू निकम, रविंद्र शेडगे, अजित पवार,अमोल गंगावणे, ऋषीकेश जावळे, सतिश कांबळे, योगेश कांबळे शशिकांत गंगावणे, राजु बाबर, अमोल पाटोळे, लक्ष्मण सोनवणे, अक्षय बनसोडे, दीपक धडचिरे , धनाजी वाघमारे, सुनिल लादे, जे, डी. वाघमारे, निलेश थोरवडे, अनिल कांबळे, भगतसिंग कांबळे, अजय कांबळे, प्रविण कदम, सिद्धार्थ खरात कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्यने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.