सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयामुळे आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साताऱ्यातील पोवई नाका परिसरात निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान,आज अज्ञातांनी राष्ट्रवादी भवनांवर दगडफेक करण्यात आली. तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवास्थानासमोर शेण्या पेटवल्याची घटना घडली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले. येथील पोवईनाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. मराठा समाजाचे रौद्ररुप राज्य सरकारला दिसेल. असा इशारा दिला होता. आज अज्ञातांनी राष्ट्रवादी भवनांवर दगडफेक करण्यात आली. तसेच गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवास्थानासमोर शेण्या पेटवल्याची घटना घडली. पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन अज्ञाताचा शोध सुरु केला आहे
You must be logged in to post a comment.