सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा घरामधील स्वयंपाक घरातील लोखंडी तवा डोक्यात घालत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंगल अशोक पांचाळ (वय ६० ,रा.सध्या धनगरवाडी ता.खंडाळा मूळ रा. अरुळे ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अरुळे ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग येथील हृषीकेश अशोक पांचाळ हे पुणे याठिकाणी नौकरीनिमित्त कुटुंबियांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान,हृषीकेश पांचाळ यांनी डिसेंबर २०२० रोजी एका व्यक्तीकडून धनगरवाडी ता.खंडाळा येथील एका गृहप्रकल्पामध्ये चौथ्या मजल्यावर घर खरेदी करीत १ जानेवारी २०२१ रोजीपासून त्याठिकाणी वडील अशोक पांचाळ व आई मंगल पांचाळ हे दोघे त्याठिकाणी राहण्याकरिता आहे.
अशोक पांचाळ यांना व्यसन असल्याने घरामध्ये पूर्वीपासून वारंवार वादावादीचे प्रकार घडत होते. मंगळवारी अशोक पांचाळ व मंगल पांचाळ यांच्यामध्ये पूर्वीच्या घरगुती वादामधून शाब्दिक चकमक उडाल्यानंतर अशोक पांचाळ यांनी मंगल पांचाळ हीचा लोखंडी तवा घालून खून केला. याप्रकरणी अशोक रामचंद्र पांचाळ (वय ६६ रा. सध्या धनगरवाडी ता.खंडाळा ) यांना खूनप्रकरणी शिरवळ पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहे.
You must be logged in to post a comment.