लॉकडाउन, कडक लॉकडाउन, संचारबंदी इत्यादी रोज बदलण्या-या सुचनांमुळे उदयोजक मेटाकुटी

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) लॉकडाउन, कडक लॉकडाउन, संचारबंदी इत्यादी रोज बदलण्या-या प्रशासनाच्या सुचनांमुळे उदयोजक मेटाकुटी आले आहेत. सातारा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनच्या अर्थात मासच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे भाजपचे खासदार उदयराजे भोसले यांची भेट घेवून लॉकडाऊन मुळे येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली.

उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग-व्यवसाय देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. सुमारे सव्वा वर्षांपेक्षा जास्त लोटालेल्या कोरोना काळामुळे सातारच्या दोन्ही एमआयडीसी मधील उद्योग आस्थापना डबघाईच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी रेट, डेयरेट इत्यादींच्या आकडेमोडीचा घोळ करत न बसता, जरूरीच्या नियमाधिन राहुन साताराच्या जुन्या आणि नव्या अश्या दोन्ही एमआयडीसी मधील उदयोगांना नवीन नियमावली जारी करुन, उभारी देण्याचे प्रामाणिक प्रयत्न जिल्हाप्रशासन आणि मास संयुक्त प्रयत्नामधुन करावेत. यावेळी साताराच्या मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनचे अर्थात मासचे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते प्रमुख उपस्थित होते.

मास ने सामुहिक प्रयत्नामधून वेळोवेळी स्वबळावर किंवा शासनाच्या सहकार्याने अनेक उपक्रम सातारच्या एमआयडीसीच्या विकासासाठी राबविलेले आहेत. मासचे पदाधिकारी-सदस्य हे स्वतः उत्पादक, उद्योजक असल्यामुळे त्यांना दैनंदिन येणा-या समस्यांची चांगली जाण आहे. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळात खर्च बचत करून, कोरोना हे संकट न समजता, संधी समजुन, साताराच्या एमआयडीसी मधील सर्व उदयोगांनी कोरोनाकाळातील नियन, व अटी शर्तींचे पालन करण्याचे प्रयत्न मोठया हिमतीने केले आहेत. तथापि आता संयम आणि धीर सुटत जाण्याची भिती उत्पादक उदयोजकांना वाटत आहे. ती भीती रास्त आहे. उत्पादन सुरु नसताना, स्थायी आस्थापना खर्च करावाच लागत आहे. वीज, लाईटबील, सुरक्षाखर्च इत्यादी प्राथमिक स्वर्च थांबलेले नाहीत, अश्या परिस्थितीत लॉकडाउन, कडक लॉकडाउन, संचारबंदी इत्यादी रोज बदलण्या-या सुचनांची अंमलबजावणी करताना उत्पादक उदयोजक आज रोजीला मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे उदयोगक्षेत्र असलेल्या भागाकरीता, औदयोगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी यांनी मास संस्थेशी चर्चा करून, समयसुचकता आणि काळाची गरज म्हणून येणा-या काळात नव्याने सुधारित आदेश जारी करावेत, उत्पादन- उदयोगांमुळे त्या त्या भागातील अर्थचक्राला गती मिळत असते. ठप्प होण्याचे मार्गावर असलेल्या साताराच्या औदयोगिक अर्थचक्राला गती देण्याचे नैतिक कर्तव्य जिल्हा प्रशासनाने आणि राज्य औदयोगिक विकास महामंडळाने संयुक्त जमानदारीतुन पार पाडावे.


यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, उद्योजक अमोल कुलकर्णी, परेश सामंत, सचिन सामंत, अमित भालेराव, राहुल शिंदे, स्वप्निल बराडकर,केदार मुरुडकर, प्रसाद पंडित, .प्रमोद पाटील, रणजित घोरपडे, माजी सभापती सुनील काटकर, बाळासाहेब ननावरे, विनित पाटील, शफी इनामदार, आदी स्थानिक उद्योजक उपस्थित होते.

error: Content is protected !!