जावळी तालुक्यातील पाककृती स्पर्धेत मातापालक सौ.करंजकर विजेत्या

सायगाव,(अजित जगताप यांजकडून): प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तृणधान्यापासून पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सातारा जि.प.प्राथ. शाळा, सायगाव ता.जावळीचे प्रतिनिधित्व करणारे मातापालक सौ.नयना संदीप करंजकर यांनी संपूर्ण जावली तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळवून पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सपोर्ट टीमचे शाळेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

जावळीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,सायगाव बीटचे विस्तार अधिकारी श्री.कर्णे साहेब , केंद्र प्रमुख श्री हंबीरराव जगताप तसेच सर्व सायगाव ग्रामस्थ व केंद्रातील सर्व शिक्षक यांनी सौ.करंजकर यांचे अभिनंदन व कौतुक केले. उपशिक्षक श्री. अतुल नानोटकर (मराठी शाळा) मुख्याध्यापक श्री. संदिप दिनकर आगुंडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!