मायणी येथील सोनाराचे दुकान लुटण्याचा प्रयत्न करणारी सशस्त्र टोळी ४ दिवसात गजाआड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मायणी येथील सोनाराचे दुकान लुटण्याचा प्रयत्न करणारी सशस्त्र टोळी ४ दिवसात गजाआड करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुस, एक एअर पिस्टल व ९ बनावट पिस्टल वापरलेले एक देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत , एक एअर पिस्टल व ९ बनावट पिस्टल जप्त केली.

७ आक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ७.५५ बा. चे सुमारास मायणी, ता.खटाव, जि.सातारा येथील सुरेश कॉम्प्लेक्स मध्ये असणारे “ बालाजी ज्वेलर्स” या दुकानामध्ये चार अनोळखी चोरटयांनी जावून तक्रारदार अमित प्रभाकर माने रा. मायणी, ता.खटाव, जि.सातारा यांना हत्यारांचा/ पिस्टलचा धाक दाखवून त्यांची कॉलर पकडून “ माल काढ” अशी धमकी देवून त्यांचे “बालाजी ज्वेलर्स” हे सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन वडूज पोलीस ठाणे गुन्हा नोंद आहे.

सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, सातारा व अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी तात्काळ ‘घटनाठिकाणी भेट देवुन सदरचा गुन्हा उघड करण्याच्या विशेष सूचना पोनी किशोर धुमाळ, यांना दिलेल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या सदर पथकाने गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरील साक्षीदार व सीसीटिव्ही फुटेज वरून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

error: Content is protected !!