नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले सातारा नगरपालिकेस बाय बाय

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या सदस्यांची 5 वर्षाची मुदत संपत आहे. निवडणूक काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या वतीने शहरात ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम सुरू आहे. मात्र, या कार्यक्रमास अनुपस्थित असणाऱ्या नगराध्यक्षा माधवी कदम बऱ्याच दिवसातून आज नगरपालिकेत आल्या. यावेळी नगरपालिकेत पुन्हा पाऊल n टाकण्याचा निर्धार करत पालिकेला आणि कर्मचाऱ्यांना बाय-बाय केले.

सातारा नगरपालिकेत पाच वर्षांपूर्वी सातारा विकास आघाडीने सत्ता मिळवली. तसेच थेट नगराध्यक्ष निवडणूकीत माधवी कदम यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांचा पराभव केला. पाच वर्षे नगराध्यक्षा कदम यांनी सत्ताधारी सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी आणि भाजप या तीन गटातील नगरसेवकाना विचारात घेऊन विविध विकास कामे हाती घेतली होती.

पाच वर्षानंतर सध्याच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांची मुदत संपत असल्याने लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्ये आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. यामध्ये सर्व सातारकरांना एक गोष्ट जाणून येत आहेत ती म्हणजे नगराध्यक्षा माधवी कदम या विकास कामांच्या कार्यक्रमात कुठेही दिसत नाहीत. त्यावरून सध्या पक्ष नेतृत्व आणि सातारा विकास आघाडीतील नगरसेवक यांच्या मनात माधवी कदम यांच्या बद्दल नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.

आज माधवी कदम पालिकेत आल्या असता पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा एक प्रकारे निरोप समारंभ केला.

error: Content is protected !!