संचारबंदीत प्रसारमाध्यमांना परवानगी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात बुधवारपासून सुरू होणाऱ्या संचार बंदीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी शेखऱ सिंग यांची भेट चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्वांना मुभा दिल्याचे जाहीर केले.

यावर्षी लाॅकडाऊन दुसऱ्या लाटेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी संचार बंदी जाहीर केली. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. वृत्तपत्रातील अधिस्वीकृती पत्रकारांनाच संचारबंदीतून वगळण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हटले होते. त्यामुळे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सचिव दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, राजेश सोळस्कर, दिपक शिंदे, चंद्रसेन जाधव, पद्याकर सोळवंडे, तुषार तपासे, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, संदीप राक्षे, साई सावंत, ओमकार कदम, सनी शिंदे, विशाल कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून त्यांच्यासमवेत बैठक केली.

केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांवर वृत्तपत्रांचे कामकाज चालत नाही. वृत्तपत्रातील व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व घटकांची संचारबंदीतून मुक्‍तता करणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पटवून दिले.

पूर्वीप्रमाणेच वृत्तपत्रे व कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, हे मी आत्ताच जाहीर करतो. शासनाने तेवढे अधिकार जिल्हापातळीवर ठेवले आहेत. याचा वापर करुन अधिकृत वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व पत्रकार व कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी वृत्तपत्र कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कर्मचाऱ्यांची अधिकृत यादी माझ्याकडे पाठवण्यात यावी. मी जिल्हा ‘पोलीसप्रमुखांशीही याबाबत चर्चा करेन, म्हणजेच जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांमधील कोणत्याही अधिकृत घटकाला अडचण येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

error: Content is protected !!