मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गेली आठ वर्षे चर्चेत असलेल्या सातार्‍यातील मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मेडिकल कॉलेजच्या मंजुरीच्या अनुषंगाने गुरुवारी अंतिम मोहर उमटवली. त्यामुळे लवकरच एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

संपूर्ण शैक्षणिक वर्षात भौतिक मानव संसधान, अध्यापन विद्याशाखा आणि क्लिनिकल साहित्य या पायाभूत सुविधांची
पूर्तता ब देखरेख करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मेडिकल कॉलेजच्या डीन यांना दिले आहेत.

राज्यात आघाडीचे सरकार असताना आठ वर्षांपूर्वी सातार्‍यासाठी मेडिकल कॉलेज मंजूर झाले. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातार्‍यातील मेडिकळ कॉलेजबाबत आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. श्रेयवाद आणि त्यानंतर जागा हस्तांतर उशिरा झाले. जलसंपदा विभागाची
जागा ताब्यात मिळून ती मेडिकल कॉलेजच्या नावावर करण्यात आली.

पाटबंधारेतील काही प्रकल्पांची कार्यालये हलवण्यात आली आहे. त्याठिकाणी मेडिकल कॉलेजचे बोर्डही लावण्यात आले आहेत. या सातार्‍यातील मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी केंद्र शासनाने अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मेडिकल कॉलेजसाठी केंद्रीय स्तरावर प्रामुख्याने खा. श्रीनिवास पाटील यांनी तर राज्य स्तरावर उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी पाठपुरावा केला.

error: Content is protected !!