सातारा : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. या पंचनाम्यात एकही बाधित कुटुंब वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
अतिवृष्टीमुळे बाधितांसाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे ज्या गावांची पाण्याची योजना वाहून गेली किंवा खराब झाली आहे, अशा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, ज्या गावांचा दळण-वळणाचा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. तिथे तात्पुरता रस्ता तयार करावा तसेच ज्या गावांमध्ये वी नाही, त्या गावांमध्ये विद्युत वितरण कंपनीने तात्काळ काम सुरु करुन लाईटची व्यवस्था करावी.
You must be logged in to post a comment.