अतिवृष्टीमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रालयात बैठक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई व महाबळेश्वर तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनी व बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत तसेच भूस्खलन प्रवण गावांच्या पुनर्वसनासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे बैठक झाली.

जुलै 2021 मध्ये सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील काही भागात दरड कोसळून गावांच नुकसान झालं त्या गावांचे लवकर पुनर्वसन होणे आवश्यक आहे.तसेच यामध्ये घरे आणि शेतीचे नुकसान झालेले आहे. याबाबत नव्याने प्रस्ताव तयार करून द्या आशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम व मृद, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, कृषी सचिव व अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!