सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून त्यातून त्या मुलीची प्रसूती झाल्याची खळबळजनक घटना कोरेगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे.
याप्रकरणी एका युवकाला वाठार पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित पीडित मुलगी १६ वर्षे ६ महिन्यांची असून, संशयित आरोपी युवक हा ३२ वर्षांचा आहे. दोघेही एकाच गावातील आहेत. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संबंधित युवकाने मुलीच्या घरात व स्वत:च्या घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन संबंधित युवकाने मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले. यातून मुलगी गरोदर राहिली. तिला २ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिची प्रसूती झाली.
वाठार पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली.
You must be logged in to post a comment.