सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :काही दिवसांपूर्वी साताऱ्यात तरुणांमध्ये लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या तरुणांमध्ये नेमक्या कोणत्या कारणातून हाणामारी झाली, याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घटनेची जिल्ह्यात आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज अचानक त्यांच्या यामाहा rx 100 वरून सातारा शहरातील महाविद्यालय परिसर गाठला.
व्हॅलेंटाइन वीक’ जवळ आला की महाविद्यालयीन तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. मात्र ही गोष्ट आपल्या संस्कृतीसाठी चांगली नसल्याचं म्हणत काही घटकांकडून यावर टीकाही केली जाते. याच ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या दरम्यान सातारामध्ये मात्र चांगलाच राडा झाल्याचं समोर आलं आहे. वायसी महाविद्यालयात ‘प्रपोज डे’च्या निमित्ताने महाविद्यालयातील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
छत्रपती शिवाजी काॅलेज येथे मंत्री देसाईंनी यामाह थांबवून विद्यार्थिनीशी संवाद साधला. तुम्हांला महाविद्यालय परिसरात काेणाचा त्रास होतो का असे विचारले. निर्भया पथक व्यवस्थित काम करते आहे का? पथकाची मदत होते आहे याची त्यांनी माहिती घेतली.
त्याच बरोबर हुल्लडबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दम भरला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सोबत साध्या वेषात पोलिस कर्मचारी यांनी देखील महाविद्यालय परिसरात पहाणी केली.
You must be logged in to post a comment.