सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोना संसर्ग पसरु नये म्हणून शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन नवीन वर्षाचे स्वागत घरात राहून करता यावे यासाठी नववर्षाच्या पूर्व संध्येला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरात विविध ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची पहाणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल सोबत होते.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहरातील पोवई नाका, मोती चौक, राजवाडा परिसर, बोगदा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली. तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना अनुचित प्रकार घडू नये याबाबतच्या आवश्यक त्या सूचना केल्या.
यानंतर गृह राज्यमंत्री देसाई यांनी पोलीस मुख्यालयातून जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला वायरलेसवरून कायदा व सुव्यवस्था कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व पोलीस यंत्रणेला नववर्षाच्या शुभेच्छाही वायरलेसवरून दिल्या.
You must be logged in to post a comment.