सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांसाठी असलेल्या बाळशांस्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटींबाबत लवकरच मंत्रालयात बैठक लावू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिली.
नायगाव तालुका खंडाळा येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे,सदस्य चंद्रसेन जाधव यांनी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना याबाबत लेखी निवेदन दिले.त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
सातारा पुणे सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे प्रस्ताव परत येत असल्याने ,बराच काळ प्रलंबित राहत असल्याने पत्रकारांनी या त्रुटींबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती.योजना असूनही पात्र व गरजू पत्रकारांना लाभ मिळत नाही .पुणे विभागातील सातारा ,पुणे ,सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचे प्रस्ताव माघारी येत आहेत. ही बाब हरिष पाटणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या विषयावर मंत्रालयात मुख्यमंत्री महोदय,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख ,किरण नाईक,माहिती व जनसंपर्क विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी अशी स्वतंत्र बैठक लावावी अशी मागणी पाटणे यांनी केली.त्यावर तत्काळ मुख्यमंत्री महोदयांनी अशी बैठक लवकरच लावू अशी ग्वाही दिली.
You must be logged in to post a comment.