पॉझिटिव्ह दर कमी झाल्यामुळे निर्बंध सैल

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठीसाठी काही निर्बंध सैल केले आहेत.

सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सायं. 5.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत तसेच आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करणेत आलेली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरीकास संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने/आस्थापना या सकाळी 9.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल/औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल/औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकान/आस्थापना या पुर्णपणे बंद राहतील. मॉल / सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 9 ते रात्री 8 वा. पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पुर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉप इत्यादीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. ज्या खाजगी कार्यालयांना मुभा देण्या आलेली आहे अशी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. शासकीय कार्यालये व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेली आहे अशा कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत चालू ठेवणेस परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल.

चित्रीकरण – आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर कोणालाही संचार / प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही.
सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल/कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

error: Content is protected !!