सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दहिवडी येथील माण पंचायत समितीच्या सभापतिपदी अपर्णा भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत पुन्हा एकदा पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची एकजूट पाहण्यास मिळाली. सभापतिपदाच्या रिक्त जागेसाठी काल पीठासीन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली.
आजसुद्धा विविध पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या नितीन राजगे, तानाजी कट्टे, तानाजी काटकर, रमेश पाटोळे, लतिका वीरकर, अपर्णा भोसले, रंजना जगदाळे, चंद्राबाई आटपाडकर या आठ सदस्यांनी एकजूट कायम ठेवली. विजयकुमार मगर व कविता जगदाळे या दोघांनी भूमिका तटस्थ ठेवली. त्यामुळे विहित कालावधीत बिदाल गणातून निवडून आलेल्या अपर्णा सोमनाथ भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कालावधी संपल्यानंतर अपर्णा भोसले यांची सभापतिपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
You must be logged in to post a comment.