आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक; पोलिसांत तक्रार दाखल

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केल्या जातात. मात्र गेल्या तीन- चार दिवसापासून ऍडमिनचा अक्सेस काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर सदरचे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले.

याबाबतची रीतसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली असून सदर पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्यास सबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनाधिकृत पोस्ट पडल्यास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!