सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मनसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.
मनसैनिकांच्यावतीने सातारा शहराच्या विविध भागात राज ठाकरेंच्या 53 व्या वाढदिनी विविध प्रकारची 53 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले, तसेच, शहरातील ज्या लोकांचे हातावरचे पोट आहे, ज्यांना रोज कामावल्याशिवाय घरात चूल पेटत नाही अशा जनतेला कामाठीपुरा, गोळीबार मैदान, चारभिंत या परिसरातील गहू, तांदूळ, ( २ टन धान्य ), सॅनिटायझर, हैन्ड वाॅश ,एनर्जी ड्रिंक पावडर , इत्यादी गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल पवार, सातारा जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, अझहर शेख, दिलीप मामा सोडमिसे, वैभव वेळापुरे, शाखा अध्यक्ष चैतन्य जोशी, अविनाश भोसले, अर्जुन शिंदे, गणेश पवार, अनिकेत साळुंखे, सागर पवार, निखिल कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रतीक माने, उपतालुका अध्यक्ष आकाश माने, विभाग अध्यक्ष सातारा, तसेच महिला जिल्हा अध्यक्ष सोनाली शिंदे, महिला शहर अध्यक्ष वैशाली क्षीरसागर, अर्चना जगदाळे, प्रेरणा निकम, सुषमा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.