सातारा, (भूमी शिल्प वृत्तसेवा) : सातारा नगर परिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणेबाबत मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मनसे तर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगर परिषद मुख्याधिकारी बापट यांचेकडे साताऱ्या सह अन्य ठिकाणील विभागाचा पदभार असल्याने सातारा शहरातील अनेक समस्या सोडवण्यास ते असमर्थ आहेत, सातारा नगर परिषदेमध्ये फार कमी वेळा ते उपस्थित असतात, त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे झालेली आहेत, त्यास पत्र देऊन कायदेशीर कारवाई करणार असले बाबत पत्रके काढून संबंधित विभागाला पाठीशी घालण्याचे काम मुख्याधिकारी अभिजीत बापट हे वारंवार करत आहेत तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, तरी सातारा शहराला नव्याने जोडण्यात आलेल्या त्रिशंकू भागातील अनेक समस्या तोंड आ वासून उभ्या आहेत त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना झालेली दिसून येत नाही तरी वाढीव हद्दवाढ होऊन आठ ते नऊ महिने उलटून गेले असून नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार अजूनही पूर्णतः मिळत नाहीत त्यामध्ये मुख्याधिकारी व नगरपरिषद प्रशासन यांना अपयश आलेले आहे, तरी अभिजित बापट हेच सातारचे मुख्याधिकारी असा घाट काही राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी घातला आहे तरी राजकारणापेक्षा नागरिकांना सुविधा मिळाव्या हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी सातारा नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे, यासंदर्भात कायमस्वरूपी मुख्याधिकारी सातारा नगर परिषदेत देण्यात यावा असे निवेदन माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री शिंदे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, महिला शहराध्यक्ष सौ वैशाली क्षीरसागर, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, अझर शेख, विभाग अध्यक्ष गणेश पवार, शाखा अध्यक्ष चैतन्य जोशी, तसेच सौ प्रियांका आवळे उपस्थित होते. सदरील निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
You must be logged in to post a comment.