मनसे उदयनराजेंसोबत; अभ्यंकर यांचे सूतोवाच
रहिमतपूर,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची रहिमतपुरात भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे आपल्या सोबत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,युवराज पवार,विकास पवार,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार, राहुल काटकर, प्रथमेश नवले,अश्विन गोळे,अथर्व अभ्यंकर,सातारा शहराध्यक्ष राहुल पवार आदींनी उदयनराजेंशी चर्चा केली.
यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, कराड उत्तर प्रचार प्रमुख मनोजदादा घोरपडे, शिवसेनेचे नेते वासुदेव माने आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.