शेतकऱ्यांबद्दल केंद्र सरकारला सहानुभुती : रामदास आठवले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा):पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन कृषी कायदे आणले आहेत. ज्या शेतकऱ्यानी त्यांन सत्तेवर आणले आहे, त्यांच्या विरोधात ते कायदे करणार नाहीत. एक कायदा मागे घेतला तर अनेक कायदे मागे घ्यावे लागतील. सरकारसोबत त्यांनी मागण्यासंदर्भात चर्चा करावी. सगळे कायदे मागे घ्या, ही मागणी बरोबर नाही. हे कृषी कायदे मागे घेतले तर प्रत्येकवेळी आंदोलन होईल आणि कायदे मागे घेण्याची मागणी केली जाईल. त्यामुळे पार्लमेंटच्या निर्णयाला, मंत्रीमंडळाच्या निर्णयाला काही अर्थ राहणार नाही. शेतकऱ्यांबद्दल केंद्र सरकारला सहानुभुती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज शनिवारी कऱ्हाड येथे केली.

आरपीआयचे येथील (कै) युवराज काटरे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मंत्री आठवले कराडात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते. 

आठवले म्हणाले, बैलगाड्यांच्या शर्यती होतच असतात. कोरोना असल्यामुळे त्यावर काही ठिकाणी बंदी आणण्यात आली आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. त्यामुळे बंदी केली आहे. ग्रामीण भागात बैलगाड्यांची स्पर्धा होते. त्याला परवानगी द्यायला हाकरत नाही. बंदी असेल तर राज्य सरकारने कोरोना संपल्यानंतर बैलगाड्यांना परवानगी दिली पाहिजे.

error: Content is protected !!