सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दलित समाजातील मयत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप करण्याचा प्रकार करणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी जनता क्रांती दलाच्या वतीने जाहीर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जयकुमार गोरे यांच्या निषेधाच्या तीव्र घोषणा दिल्या.
जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. निवेदना म्हटले आहे की, मायणी येथील महादेव पिराजी भिसे हे मातंग समाजातील असून त्यांची वडिलार्जीत मिळकत गट आहे. त्याच्या लगत छत्रपती शिवाजी एज्युकेशन मायणी यांच्या तत्कालीन अध्यक्षांचा मालकी हक्क व कब्जे वहिवाटीची आहेत. या संस्थेचे जयकुमार गोरे हे अध्यक्ष असून संस्थेच्या मिळकतीत येण्या जाण्याकरिता सहायक संचालक नगर रचना सातारा यांच्या कार्यालयात नकाशासाठी व भूसंपादनासाठी अर्ज सादर केला आहे. त्यावेळी माण तहसीलदारांकडे ११ डिसेंबर २०२० रोजी ॲफेडेव्हिट नोंदविले आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी पदाचा गैरवापर करून मयत पिराजी विष्णू भिसे यांच्या नावे अज्ञात व्यक्तीला उभे करून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करून जयकुमार गोरे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी संगनमताने महादेव भिसे व कुटुंबाची फसवणूक करून प्रतिज्ञापत्राचा खोटा मजकूर तयार करण्याचा प्रकार केला आहे. तसेच नगर रचना विभाग सातारा यांनाही खोटे ॲफेडेव्हिट दिले. संबंधित व्यक्तीच्या सात/बारा उताऱ्यास बेकायदेशीररीत्या फेरफार बदल करण्याचा प्रकार जयकुमार गोरे यांनी केला आहे.
You must be logged in to post a comment.