साताऱ्यात माॅर्निंग वाॅक भोवले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लाॅकडाऊन केले असून लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडून नये, असे आवाहन केले जात आहे. तरी बहुसंख्य लोक माॅर्निग वाॅर्कच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडत आहे. अशा लोकांवर सातारा शहर व तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला असून एका दिवसात तब्बल १८ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच प्रशासनाने दुकानदारांना ठरवून वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारपासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!