सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील गुरुवार बागेजवळ नगरपालिकेच्यावतीने पाईपलाईनचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेला खड्डा वाचविण्याचा प्रयत्नात शुक्रवारी रात्री दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पोला धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.विनायक संपतराव साळुंखे (वय ३५, रा. पिलानीवाडी, ता. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विनायक साळुंखे हा दुचाकीवरून समर्थ मंदिरकडून पोवई नाक्याकडे निघाला होता.तर नाक्यावरून समर्थ मंदिरकडे पिकअप टेम्पो येत होता. याचवेळी गुरुवार बागेजवळील शुभम ॲटो गॅरेज समोर दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की विनायक साळुंखे याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
You must be logged in to post a comment.