हिंदवीत मातृदिन साजरा

सातारा,(भूमीशिल्प वृत्तसेवा): कोरोना काळात कोणताही सण, उत्सव साजरा करणे थोडेसे कठीण झाले. मात्र,हिंदवी पब्लिक स्कूलने प्रत्येक सण नेहमीच्या उत्साहात साजरा केला. यंदाही लाॅकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी घरामध्ये राहूनच मातृदिन उत्साहात साजरा केला.

आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी,तिचा सन्मान करण्यासाठी,कुटुंबातील प्रत्येकासाठी सतत कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी ९ मे हा मातृ दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान हे अत्यंत मोलाचं असतं. या दिवसाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे.लॉकडाऊन असल्यामुळे कोणालाच मनाप्रमाणे मातृदिन साजरा करता आला नाही. पण सोशल मीडियावर प्रत्येकाने वेग-वेगळ्या प्रकारे आपल्या जन्मदात्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनामुळे मातृदिन कसा साजरा करायचा, असा प्रश्न सर्वांनाचा पडला आहे. अशा वेळी साताऱ्यातील हिंदवी पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना घऱात राहून आपल्या आईचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तिच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईच्या आवडीचे जेवण केले. तिला शुभेच्छा पत्र, कविता लिहिली तर काहींनी चित्र काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींनी तर आईला सरप्राईज गिफ्टही दिलं. त्यामुळे तिचा संपूर्ण दिवस खास होऊ शकला.

error: Content is protected !!