सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वत: विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शहरातील रूक्मिणीनगरमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली.
या घटनेत मातेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालेल्या पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याची चिट्ठी त्या महिलेने लिहून ठेवली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. अनुष्का सुजित आवटे (वय ३६, रा. रूक्मिणीनगर, वाखाण रोड, कºहाड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. तर हर्ष सुजीत आवटे (वय ८) व आदर्श सुजित आवटे (वय ६) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाखान परिसरात राहणाºया सुजीत आवटे यांचे चार महिन्यांपुर्वी अपघाती निधन झाले आहे. तेव्हापासून त्यांची पत्नी अनुष्का या नैराश्यात होत्या. सध्या रुक्मिणीनगरमध्ये वाखान रोड येथील घरात अनुष्का यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा हर्ष व लहान मुलगा आदर्श असे तिघेजण वास्तव्यास होते. त्यांचे घर तीन मजली असून दुसºया मजल्यावर दिरासह इतर कुटूंबिय राहतात. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजले तरी हर्ष व आदर्श ही दोन्ही मुले खेळण्यासाठी आली नाहीत, त्यामुळे मुलांची आजी दुसºया मजल्यावरून तिसºया नंबरच्या मजल्यावर गेली. आज्जीने मुलांना हाक मारली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती मुले झोपत असलेल्या रूममध्ये गेली. तेथे मुले बेडवर निपचीत पडलेली होती. त्यांच्या अंगावर पांघरून होते. तर त्यांच्या बाजूलाच अनुष्काही निपचित पडल्या होत्या. आजीने मुलांच्या अंगावरील पांघरुण बाजूला करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले जागची हलली नाहीत. त्यामुळे आजीला संशय आल्याने त्या मोठमोठ्याने ओरडत खोलीतून बाहेर पळाल्या. त्यानंतर इतर नातेवाईक व शेजारी त्वरित त्याठिकाणी धावले. समोरील दृष्य पाहून सर्वांना धक्काच बसला. हर्ष व आदर्श नातेवाईकांना मृतावस्थेत आढळून आले. तर अनुष्का यांची प्रकृती गंभीर होती. नातेवाईकांनी तातडीने त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दोन्ही मुलांचा गळा दाबून मी स्वत: आत्महत्या करीत आहे, असे अनुष्का यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसात झाली आहे.- चौकटमुलांना वडिलांचे प्रेम मिळत नाही..!अनुष्का या पती सुजीत यांच्या निधनाने एवढ्या दु:खी झाल्या होत्या की, प्रत्येक ठिकाणी त्यांना पतीची उणिव जाणवते. त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीतून ते स्पष्ट होत आहे. मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नाही. त्यांच्याशिवाय जगण्यात काहीच अर्थ नाही. या घटनेला कोणालाच जबाबदार धरू नका. त्रास देऊ नका, असे अनुष्का यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच त्यांनी ही चिठ्ठी पोलिसांना उद्देशून लिहीली आहे.
You must be logged in to post a comment.