सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे – बैंगलोर महामार्गावर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उडतारे हद्दीत एका चालत्या एसटी बसनं पेट घेतल्यानं एकच गोंधळ उडाला. कोल्हापूरहून पुण्याकडे जात असताना एसटी बसला हा अपघात झाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झालेलं नाही.
रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उडतारे गावच्या हद्दीत आनेवाडी टोलनाक्या जवळ चालत्या एसटीनं पेट घेतला. राज्य परिवहन महामंडळाची ही एसटी बस कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं जात होती. या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
You must be logged in to post a comment.