शाश्वत विकासासाठी एकत्र वाटचाल : खासदार उदयनराजे भोसले

नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा

लिंब,(भूमिशिल्प वृत्तसेवा): संपूर्ण जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे गतीने सुरू आहेत. आता हीच गती कायम ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने आशीर्वाद द्यावा, आगामी काळात शाश्वत विकास कामांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि मी एकत्रित काम करणार आहोत, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

नुने, ता. सातारा येथे आयोजित केलेल्या लिंब जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदेवराव सावंत, चंद्रकांत इंगवले, संभाजी इंदलकर, बाजार समितीचे संचालक अरुण कापसे, महादेव धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होते.

उदयनराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीत देखील आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना आपण मोठे पाठबळ द्यायचे आहे. 

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, विरोधकांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये. आपण सर्वांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठीच काम करायचे आहे. या लोकसभा निवडणुकीत सातारा जावळी मतदारसंघातून उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

error: Content is protected !!