सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झालेला आहे.
स्वराज साखर कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी दिगंबर आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्याबाबत तक्रार केली हाेती. त्यानंतरही गुन्हा दाखल नाही.
त्यामुळे आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण पोलीसांनी खासदार निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
You must be logged in to post a comment.