उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी खासदार पाटील यांनी घेतली केंद्रीय कायदे मंत्र्यांची भेट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ किंवा पहिल्या टप्प्यात सर्किट बेंच व्हावे, यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली.

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे,’ हा प्रश्‍न 30 वर्षांहून अधिक काळ भिजत ठेवला आहे. यासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी आंदोलन केले आहे. मेळावे, ‘रास्ता रोको’, कामकाजावर बहिष्कार, नेत्यांना निवेदने, न्यायाधीशांसमवेत बैठका, साखळी उपोषण, कृती समितीच्या माध्यमातून जनजागृती, अशा विविध आंदोलनांच्या माध्यमामधून ही मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली आहे. पण, निर्णय काही होऊ शकलेला नाही.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन तातडीने या प्रश्नावर लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!