सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर कराड येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी सोशल मीडियावरून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेत कोरोना चाचणी करावी असे आवाहनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.