महामार्गावरील कामांची खासदार पाटलांकडून पाहणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेंद्रे, सातारा ते कागल महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध प्रस्तावित कामांबाबत सूचना केल्या.

यावेळी महामार्गावरील शिवडे फाटा येथे नियोजित उड्डाणपूलाच्या जागेची, उंब्रज येथील एस आकाराच्या धोकादायक वळणाची तसेच इंदोली फाटा येथील नियोजित उड्डाणपूलाच्या जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना महामार्गाच्या कामात असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देत कराव्या लागणाऱ्या दुरूस्ती व आवश्यक बदला संदर्भात त्यांना सूचना केल्या.

याप्रसंगी सारंग पाटील, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व्ही.डी.पंदरकर, सहा.अभियंता समाधान पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी महादेव चौगुले, श्री.डी.डी.बारवकर, श्री.मनोजकुमार मलिक, श्री.सुधाकर कुंभोज, श्री.संजय दातार, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक श्री.अजय गोरड, श्री.हंबीरराव जाधव, श्री.गोपाळराव येळवे, श्री.नरेंद्र सांळुखे, अॅड.प्रमोद पुजारी, श्री.अजित जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!