सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना आणि लाॅकडाऊन काळात वीज बील थकीत असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. महावितरण कंपनीकडून राज्यभरात ही मोहिम हाती घेतली आहे. यासाठी विविध पक्षांनी आंदोलन केली. मात्र, महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणी सुरू ठेवली आहे. दरम्यान, शिरवळ येथे थकीत वीजबिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन तोडल्याने एका व्यक्तीने चिडून थेट महावितरण कार्यालयात जावून तोडफोड केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, थकीत वीज बिल न भरल्याने घरगुती वीज तोडले जात आहे. शिरवळ ता.खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाचे सहाय्यक अभियंता कार्यालयाचे शहर व ग्रामीणचे मुख्य कार्यालय आहे. दरम्यान, रविवार दि. 21 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य विदयुत कंपनीच्या कार्यालयात एक कर्मचारी कामावर हजर असताना त्याठिकाणी एक युवक आला. यावेळी संबंधित युवकाने संबंधित कर्मचा-याबरोबर हुज्जत घालत कार्यालयाचे काचा लोखंडी राँडने फोडत समोरील कार्यालयाच्या दरवाज्यावर लाथा मारत कर्मचा-याबरोबर हुज्जत घातली. यावेळी अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे वीज वितरण कार्यालयामध्ये खळबळ उडाली.
You must be logged in to post a comment.