खासगीकरणाविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध करत देशभर राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. सातारामधील महावितरण कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. महावितरणच्या कार्यालयासमोर आज कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

महावितरण कंपन्यांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला. तसेच केंद्राच्या विद्युत संशोधन कायद्यालाही कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. रविवारी रात्री 12 वाजेपासून राज्य सरकारच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. सातारामधील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे . मात्र संपामुळे वीज पुरवठा सेवेवर परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले

error: Content is protected !!