सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा जिल्ह्यातील सातारासह आठ नगरपालिकांच्या सार्वजनिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात राज्य शासन निर्णय घेईल, असे प्रशासनाला बजावले असून, राज्य शासनाने नगरपालिका व नगरपंचायती अधिनियमात सुधारणा करून प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे निवडणुका आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने नगर परिषद व नगरपंचायत अधिनियमात सुधारणा केली आहे. निवडणुकांसंदर्भातील काही अधिकार राज्य शासन घेणार आहे. अधिनियम प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्तांनी महानगरपालिका, नगर पालिका व नगरपंचायती क्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया सुरु केली असेल किंवा पूर्ण केली असेल तेथे ती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. संंबंधित क्षेत्रांची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया या अधिनियमाद्वारे नव्याने करण्यात यईल, असे स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक उपायुक्तांनीही यासंदर्भात पत्र दिले आहे.
You must be logged in to post a comment.