सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नगरपालिका सातारकर नागरीकांची आहे, साविआ नेहमीच विश्वस्ताच्या भुमिकेतुन वाटचाल करीत आली आहे. नगरपालिका म्हणजे सहकारी संस्था नाही. सभासदांच्या सहकारी संस्था म्हणजे स्वतःची मालकी समजणाऱ्यांनी, घटनादत्त नगरपालिकेविषयी मालकीचे भाष्य करुन, आपली बाल्यावस्थेची एकप्रकारे कबुली दिली आहे, अशा परखड परंतु मार्मिक शब्दात कोणाचेही नाव न घेता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शाब्दीक फटकारले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, ज्यांच्या हातात सातत्याने सुमारे ४० वर्षे निरंकुश सत्ता होती. त्यांना हद्दवाढ कधी करून घेता आली नाही. ज्यांना त्रिशंकू भाग असलेल्या शाहुपूरीतील नागरीकांच्या मुलभूत गरजांची पूर्ती होण्यासाठी साधी ग्रामपंचायत सुध्दा स्थापन करता आली नाही ते आता शाहुपूरीच्या विकासाच्या वल्गना करीत आहेत.
शाहुपूरी ग्रामपंचायतीसाठी जिल्हापरिषदेचा ठराव आम्ही पुढाकार घेवून करवून घेतला आणी शाहुपूरी ग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यामुळे मुलभूत सुविधा काही प्रमाणात शाहुपूरीकरांना मिळू लागल्या. त्यास यांचा त्यावेळी विरोध होता. विरोधासाठी विरोध समजु शकतो परंतु विकासामध्येही विरोधासाठी विरोध हे त्यांचे राजकिय कौशल्य ते समजत असतील तर त्याचे त्यांना लखलाभ असो. शाहुपूरीचा दैनंदिन गोळा होणार कचरा, सोनगांव कचरा डेपोवर टाकण्याच यांच्याच कुप्रवृत्तीने विरोध केला होता हे कोणी विसरलेले नाही. शाहुपूरीचा कचरा नगरपरिषदेच्या सोनगांव कचरा डेपोवर टाकण्यास आम्ही होकार दिल्याने, कचरा टाकण्याची समस्या मिटली.
शाहुपूरीकरांसाठी नळ पाणीपुरवठा योजना यांच्या कुकर्तुत्वामुळेच रखडली. नाहीतर मागेच शाहुपूरीसह सुमारे १६ गांवेवाड्या-वस्त्यांना कण्हेर मधुन पाणी मिळाले असते. आता तोंड वर करुन, त्यामुळे शाहुपूरी नळपाणीपुरवठ्याचे उद्घाटन करणाऱ्यांना जनाची नाहीच आणि मनाची सुध्दा काही उरली आहे असे वाटत नाही. माजगांवकर माळ झोपडपट्टी सदृष्य वस्तीमधील झोपड्या काढण्यासाठी याच कपट वृत्तीने कोर्टातुन आदेश प्राप्त करून घेतले होते. त्यांना माजगांवकर माळावरील लोकांना येथुन हुसकावून लावायचे होते. त्यांना बेघर करायचे होते. हे माजगांवकरमाळावरील जनतेच्या चांगले लक्षात आहे. तथापि, तेथे घरकुल योजना राबबून, माजगांवकरमाळावरील नागरीकांना हक्काचे घर उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहीलो आहे. आम्हास स्व.दादामहाराज यांचा वारसा आहे. संपूर्ण सातारकर आम्ही आमचे कुटुंबातील सदस्य समजत आलो आहोत. त्यांच्या सुखदुःखात समरस होवून आम्ही सामिल होत असतो, म्हणूनच कोणत्याही सातारकरांस आलिंगन देताना किंवा मिठी मारताना आम्ही हातचे काही राखुन ठेवत नाही. तुम्ही हातचा राखुन ठेवणा-यांपैकी आहात. म्हणूनच तुम्हाला आमच्या मिठी मारण्याच्या पध्दतीला स्वच्छ दृष्टीने पहाता येत नसल्यानेच तुम्ही अकारणच त्याचा धसका घेतला आहे. जरा दृष्टी बदला म्हणजे दृष्टीकोन बदलेल.
You must be logged in to post a comment.