सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पिंपरद, ता. फलटण येथे मंगळवारी रात्री वडिलांनी दुसरे लग्न केले. त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मुलाच्या डोक्यात बापाने कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. यात सुरज सिकंदर भोसले (वय ३०) याचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, पिंपरद येथील वडार आळीत घरासमोर सिकंदर काळ्या भोसले व मुलगा सुरज सिकंदर भोसले दोघा बापलेकात दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास वडिलानी दुसरे लग्न का केली. या कारणावरुन वादावादी झाली. सिकंदर भोसले याने मुलगा सुरज भोसले यांच्या डोक्यात व पायावर धारदार कुर्हाडीने वार केला. यात सुरज भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
You must be logged in to post a comment.