सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे किरकोळ वादातून मुलाने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाट्याने मारहाण केली. या मारहाणीत वयोवृद्ध आईचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने खूनाची कबुली दिली.सुलोचना नाना पवार वय ७० रा.रहिमतपूर, ता. कोरेगाव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सुलोचना पवार या मुलगा शहाजी पवार (वय ३६ रा. रहिमतपूर) याच्याबरोबर रहिमतपूर बसस्थानका जवळील संरक्षण भिंतीस लागून असलेल्या झोपडीत राहत होते. शहाजी पवार याला दारू पिण्याचे व्यसन होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून आई सुलोचना व मुलगा शहाजी यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात शहाजी पवार याने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाट्याने मारहाण केली. या मारहाणीत सुलोचना पवार यांचा जागीच मृत्यू झाला. खून झाल्यानंतर संशयित आरोपी शहाजी पवार हा सकाळी स्वत:हून रहिमतपूर पोलिस ठाण्यात हजर झाला.
You must be logged in to post a comment.