सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा तालुक्यातील म्हसवे येथे काल रात्री १६ वर्षीय अल्पवयीनास लैगिंक अत्याचारातून ताेंड व गळा दाबून पाच वर्षीय बालकाचा खू्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, मुळचा माण तालुक्यातील असणारा पाच वर्षीय बालक गेले काही वर्षे आपल्या आई-वडिलांसह सातारा तालुक्यातील म्हसवे गावात भाड्यानं दोन खोल्या घेऊन राहण्यास होता. काल त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी त्याचे वडील कामावरुन परतले. यावेळी स्वयंपाक घरात मुलाचा मृतदेह आढळला.
सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी माहिती घेत घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला. तपास करत त्याच गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीनास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानं चौकशीत पाच वर्षीय बालकाचा खून केल्याचे कबुल केलं आहे.
You must be logged in to post a comment.