सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर बिल विधानसभेत मंजूर करा तसेच मुस्लिम समाजाला 5 % आरक्षण मिळले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सोमवार दि. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘प्रेषित मोहमंद पैगंबर बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
न्यायायालयाने मान्यता दिलेले 5 % मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम व मुअज्जिन आणि खुद्दाम,हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई , जिल्हा उपाध्यक्ष फारुख पटणी, जिल्हा संघटक इम्तियाजभाई नदाफ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे
You must be logged in to post a comment.