‘खाली मुंडी वर पाय’ करत नाभिक समाजाचे आंदोलन

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ’खाली मुंडी वर पाय, सरकारचे आमच्याकडे लक्षच नाय’ असं म्हणत आणि प्रत्यक्ष कृती करत मंगळवारी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्त्वाखाली सलून व्यावसायिकांकडून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सातार्‍यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सलून आणि ब्युटी पार्लरची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजाच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 12 कुटुंबांना तर खायलाही नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने सर्व सलून आणि ब्युटी पार्लरची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा प्रत्येक कुटुंबास दरमहा 5 हजार याप्रमाणे तीन महिन्यांचे 15 हजार रुपये असे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास आम्ही अन्नत्याग किंवा जलसमाधीचा मार्ग पत्करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी यावेळी दिला. या आंदोलनात नाभिक समाजातील अनेकांनी सहभाग घेतला.


error: Content is protected !!