सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदतीत संपणाऱ्या जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि ६’नगरपंचायतींचा लवकरच बिगुल वाजणार आहे. प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य वॉर्ड पद्धत पुन्हा राबबली जाणार आहे. लोकसंख्येच्या निकषावर सदस्य संख्या, प्रभाग रचना नकाशे आदींची कच्ची प्रारुप प्रभागरचना तयार करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. हे काम दि. २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील अ वर्ग सातारा पालिका, ब वर्ग फलटण व कराड पालिका, क वर्ग वाई, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी आणि म्हसवड या नगरपालिका तसेच कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी आणि पाटण या नगरपंचायतींची मुदत दि. ३१ डिसेंबरपर्यंत असून २०११ च्या जनगणनेनुसार सदस्य निश्चिती प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया केली जाईल आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. . मात्र, तत्पूर्वी कच्चा प्रारुप प्रभाग आराखडा तयार करण्यासाठी २०११ च्या जनगणनेची आकडेवारी व नकाशे गोळा करावे लागणार आहेत. या आकडेवारीवरुनच नगरपालिका तसेच नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित केली जाणार आहे,
You must be logged in to post a comment.