शाहू स्टेडियम परिसरातील खड्ड्यात अखेर पडला मुरुम

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शाहू स्टेडियम नजीक सुभाषचंद्र बोस चौकात मागील अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली होती. याबाबत सातारा पालिकेच्यावतीने मुरुम टाकून हा खड्डा तात्पुरता मुजविण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पावसाने शाहू स्टेडियमनजीक सुभाषचंद्र बोस चौकातील भूविकास बँक समोरील भलामोठा खड्डा दुचाकी चालकांच्या जीवावर उठला होता. या विभागातील नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी त्वरित या प्रकरणी लक्ष घालुन तात्काळ या खड्डयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेला सुचना केल्या. नगरपालिका अधिकारी यांनी हा खड्डा आता पावसाळ्यात डांबरीकरण करणे शक्य नाही त्यामुळे मुरुमीकरण करण्यात आले.

error: Content is protected !!