सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माथाडींच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी मागणी करून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक देखील लावली नाही. आता मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याबाबत शिवसैनिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.
मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर माथाडीच्या प्रश्नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती पण ते झाले नाही. त्यानंतर पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला ए पी एम सी मार्केट सुरू करा, असे फोन करून सांगितले होते, त्यानुसार आम्ही त्यानंतर एपीएमसी मार्केट सुरू केले. त्यानंतर माथाडी कामगारांच्या अत्यावश्यकमध्ये समावेश करून घ्यावा, असे सांगितले पण त्यांना वेळ भेटला नाही.
माथाडींच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी कधीच वेळ दिला नाही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडले नाही.महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल तर मी अलिप्त राहिलेले बरे असे त्याने स्पष्ट करत शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले.माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश दिले गरजेचे होते, पण या प्रश्नासाठी त्यांनी कधीच वेळ दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्याकडे नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले कि माझ्यावर शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी टीका होते.
You must be logged in to post a comment.