सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील बैलगाडी चालक-मालक यांनी बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात या मागणीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार शिंदे यांनी राज्यात बैलगाडी शर्यत सुरू व्हावी. अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांसोबत मी आहे, अशी ग्वाही दिली.
भेटीदरम्यान आंदोलकांमध्ये झालेल्या चर्चेत आमदार शिंदे यांनी बैलगाडी शर्यत सुरु ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या सोबत आहे. शेतकरी बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे जपतात त्यामुळे बैलगाडा शर्यत चालू होण्याकरिता जे काही करावे लागेल ते करण्यासाठी मी आंदोलनकर्त्यांसोबत होतो, आहे आणि यापुढे देखील राहीन असा शब्द यावेळी चालक-मालक व आंदोलनकर्त्यांना दिला.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार येत्या बुधवारी पशुसंवर्धन मंत्री श्री सुनील केदार साहेब यांच्यासोबत मंत्रालयात सातारा जिल्हा बैलगाडा शर्यत आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित करणार असून सातारा जिल्ह्यातील बैलगाडीवानांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत याकरिता सोमवारी सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिकारी अश्विनकुमार बंसल यांचेसोबत सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
You must be logged in to post a comment.