सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :बंगलोर येथे छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास दुधाचा अभिषेक घालण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सरचिटणीस राजकुमार पाटील, विद्यार्थी प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, सातारा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष शशिकांत वायकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा संमिद्रा जाधव, कुसूमाताई भोसले, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवती जिल्हाध्यक्षा पुजा काळे, प्रथमेश पवार, शुभम साळुंखे, प्रज्वल धुमाळ, वरद फडतरे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अनिल बडेकर, डॉ. सुनीता शिंदे, रवीना वायकर, अशोक साळुंखे, बाबा सय्यद, दीपकचाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.