सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी व घोषणाबाजी करत मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.