सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलबरोबरीने एलपीजी गॅसच्या भरमसाठ किंमती वाढल्याने किचन बजेट कोसळले आहे. त्याचा निषेध करत सोलापूरातल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा अनोखा निषेध केलाय. यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारला शेंणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पाठवल्या आहेत.
आज महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिलांनी इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात निषेध आंदोलन केले.
You must be logged in to post a comment.