सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात पक्षाचे संघटन बळकट करून शरद पवार साहेबांचे विचार घरोघरी पोहचविणे व तळागाळातील नागरीकापर्यंत करण्यात आलेली समाजोपयोगी कामे पोहचविणे गरजेचे आहे. तरच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष होइल, असा प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या परिसंवाद यात्रेच्या पाचव्या पर्वानिमित्त वाई येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे तालुक्यातील जनतेने मोठ्या उत्साहाने स्वागत केले. उपस्थितांशी संवाद तसेच कार्यकर्ता मेळाव्यास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मकरंद पाटील उपस्थित होते.
मकरंद पाटील म्हणाले,”पवार साहेबांचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष काम करत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात घर करण्याचे काम आम्ही सर्व करत आहोत. पक्ष वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जे आदेश देतील, जो कार्यक्रम देतील, त्यांची पूर्तता करण्याचे काम आम्ही करू. या संवाद यात्रेमुळे येथील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून याच उत्साहाने काम करून भविष्यात वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यासह संपुर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा मानस आहे.”
यावेळी वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील संघटनात्मक बाबींचा आढावा माननीय प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रसंगी थेट कार्यकर्त्यासमवेत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत, संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने भविष्यात कसे काम करायचे, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या आढावा बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, डीसीसी बँक अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, आयटी सेल राज्यप्रमुख सारंग पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, महिला जिल्हाध्यक्ष समीद्रा जाधव, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा काळे, तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा युवक तालुकाध्यक्ष अजय भोसले, संकल्प डोळस, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, स्मिता देशमुख, राजकुमार पाटील, वाई युवक तालुकाध्यक्ष समाधान कदम, राजेंद्र तांबे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष बाबुराव सपकाळ, खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, गोरखनाथ नलवडे, विक्रांत डोंगरे, अनिल जगताप, संगीता साळुंखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.